मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील दोन गंभीर जखमींवर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मिळाले नवजीवन


पुणे | २९ जुलै २०२६: मोशी येथील कचरा डेपो संरचना कोसळल्याच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन रुग्णांवर भोसरी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) ट्रॉमा केअरच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले असून दोन्ही रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या दुर्घटनेतील गंभीर जखमी महेश चंद्रकांत राऊत (वय ३६) यांना बचाव पथकाने बाहेर काढल्यानंतर ९ जुलै २०२६ रोजी पहाटे मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डाव्या मांडीला मोठी उघडी जखम, कपाळ व डोक्याला गंभीर जखमा व कवटीचे फ्रॅक्चर, डाव्या हाताच्या टेंडनला इजा तसेच कमरेच्या मणक्याला (लंबर स्पाईन) फ्रॅक्चर अशा अनेक जीवघेण्या दुखापती झाल्या होत्या.
रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन ऑर्थोपेडिक्स, प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, न्यूरोसर्जरी, क्रिटिकल केअर, इंटरनल मेडिसिन, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविद्याशाखीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.
डॉ. राहुल दुला गागरे आणि डॉ. दीपक सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णावर टप्प्याटप्प्याने अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये आपत्कालीन वाउंड डिब्राइडमेंट, व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर (VAC) थेरपी, बायोडिग्रेडेबल टेम्पोरायझिंग मॅट्रिक्स (BTM) चा वापर करून सॉफ्ट टिश्यू पुनर्बांधणी, डाव्या हाताच्या टेंडनची दुरुस्ती, शरीरात घुसलेले काचेचे तुकडे काढणे, चेहऱ्यावरील जखमांवर उपचार तसेच डोके आणि मानेवरील अनेक जखमा बंद करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
महेश राऊत यांना ९ जुलै २०२६ रोजी अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. तेथे रक्त संक्रमणासह (Blood Transfusion), सतत निरीक्षण आणि बहुविद्याशाखीय उपचार देण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना १२ जुलै २०२६ रोजी ICU मधून वॉर्डमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार सुरू ठेवण्यात आले आणि २९ जुलै २०२६ रोजी त्यांना स्थिर प्रकृतीत डिस्चार्ज देण्यात आला.
दुसरे रुग्ण भूषण पाटील यांनाही ९ जुलै २०२६ रोजी गंभीर दुखापतींसह मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना त्याच दिवशी ICU मध्ये दाखल करण्यात आले असून १५ जुलै २०२६ पर्यंत अतिदक्षता विभागात उपचार देण्यात आले. त्यानंतर वॉर्डमध्ये पुढील उपचार, आवश्यक शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून २८ जुलै २०२६ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यशस्वी उपचारांबाबत बोलताना डॉ. राहुल दुला गागरे, ऑर्थोपेडिक सर्जन, म्हणाले, “दोन्ही रुग्णांच्या हाडे, स्नायू, टेंडन आणि मऊ ऊतींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या होत्या. अपघातानंतर तातडीने करण्यात आलेले ट्रॉमा मूल्यांकन, समन्वयाने करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आणि सातत्यपूर्ण बहुविद्याशाखीय उपचारांमुळे त्यांच्या अवयवांचे संरक्षण करणे आणि प्रकृती सुधारण्यास मोठी मदत झाली.”
डॉ. दीपक सदाशिव पाटील, प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन, म्हणाले, “रुग्णांच्या मऊ ऊतींना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे VAC थेरपी आणि BTM सारख्या आधुनिक पुनर्बांधणी तंत्रांचा वापर करण्यात आला. या अत्याधुनिक उपचारांमुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत झाली असून भविष्यात त्यांच्या कार्यक्षमतेतही चांगली सुधारणा होईल.”
हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाने सांगितले की, विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांमधील प्रभावी समन्वयामुळे वेळेत उपचार करणे, गुंतागुंत टाळणे आणि दोन्ही रुग्णांना लवकरात लवकर पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य झाले.
आपले अनुभव सांगताना महेश चंद्रकांत राऊत म्हणाले, “मी जेवत असताना अचानक सर्व काही हलू लागले. सुरुवातीला मला भूकंप झाला असे वाटले. काही क्षणांतच कचऱ्याचा आणि ढिगाऱ्याचा मोठा भाग माझ्यावर कोसळला आणि मी त्याखाली अडकलो. जवळपास १४ तास मी त्या ढिगाऱ्याखाली होतो. प्रत्येक क्षण हा आशा आणि भीती यांच्यातील संघर्ष होता. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे मला जिवंत बाहेर काढण्यात आले आणि मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी माझे प्राण वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे, काळजीमुळे आणि सततच्या प्रोत्साहनामुळे मला आयुष्याची दुसरी संधी मिळाली. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.”
भूषण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button