
पुणे, दि. २० एप्रिल २०२६ — मा. आमदार श्री. सुनिलआण्णा टिंगरे यांच्या सूचनेनुसार विश्रांतवाडी परिसरातील साठे बिस्कीट ते चंद्रमा हॉटेल, डेक्कन कॉलेज चौक या दरम्यान बीआरटी मार्ग हटविण्याबाबत आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या बीआरटी मार्ग हटविण्याच्या ठरावाच्या अनुषंगाने ही पाहणी पार पडली. प्रस्तावित कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः विश्रांतवाडी व आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी पुणे मनपा स्थायी समिती सदस्य व प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक श्री. सुहास टिंगरे, अधीक्षक अभियंता (पथ) श्री. आशिष जाधव, कार्यकारी अभियंता (पथ) श्री. संजय धाराव, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. संदीप पाटील, उपअभियंता सौ. पौर्णिमा गायकवाड तसेच श्री. विशाल भोसले व श्री. अक्षय मोडवे उपस्थित होते.