वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

पुणे, दि. २२ : वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:०५ वाजता मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मूळचे शिक्षक असलेले विश्वास नांदेकर राजकारणात येण्यापूर्वी वेळाबाई येथील शाळेत अध्यापन करत होते. त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने वणी परिसरासह राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button