दीड वर्षाच्या नील भालेरावची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव; 45 कार ब्रँडची ओळख देत विक्रम

पुणे  दि.29 : दीड वर्षाच्या नील निखिल भालेरावने केवळ 2 मिनिटे 53 सेकंद इतक्या अल्प वेळात जगातील सुमारे 45 कार ब्रँडची अचूक ओळख देत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. एवढ्या लहान वयात स्मरणशक्तीची विलक्षण क्षमता दाखवत नीलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीलने केलेला हा विक्रम केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून त्याच्या भावी प्रवासाला नवी दिशा देणारा आहे. लहान वयात मोठ्या प्रमाणावर माहिती आत्मसात करून ती आत्मविश्वासाने सादर करण्याची त्याची क्षमता उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असते; मात्र दीड वर्षांच्या नीलसारख्या चिमुकल्याने हा मान मिळवणे ही अधिकच विशेष गोष्ट ठरली आहे.

या यशामागे नीलची जिद्द, सातत्याबरोबरच त्याचे पालक — आई प्रेरणा भालेराव आणि वडील निखिल भालेराव — यांचे मार्गदर्शन, संयम आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.

लहान मुलांमधील गुण ओळखून योग्य दिशेने प्रोत्साहन दिल्यास ते कशा उंचीवर पोहोचू शकतात, याचे सुंदर उदाहरण नीलने घालून दिले आहे. त्याच्या या यशामुळे महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button