खासदार क्रीडा महोत्सवात योगासन स्पर्धेत दोन गटांत यश

पुणे, दि. ५ :
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवात झालेल्या योगासन स्पर्धेत श्रावणी रासकर आणि अरविंद सबावत यांनी दुहेरी मुकुट पटकावला.
गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत श्रावणीने पारंपरिक मुली (१४-२० वयोगट) आणि आर्टिस्टिक पेअर मुली या दोन्ही गटांत अव्वल स्थान मिळवले. अरविंदने पारंपरिक मुले (१४-२० वयोगट) आणि आर्टिस्टिक पेअर मुले या दोन्ही गटांत बाजी मारली. विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “योगाचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अधोरेखित केले आहे. आता योगासन या खेळाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या खेळाला उज्ज्वल भविष्य असून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक शाळेने या खेळाला प्रोत्साहन दिले पाहिजे.”
निकाल :
पारंपरिक मुले (१४-२० वर्षे)
१. अरविंद सबावत
२. आयुष महतो
३. सूर्या मोहोळ
४. समर्थ खुले
५. आमव कोरडे
पारंपरिक मुली (१४-२० वर्षे)
१. श्रावणी रासकर
२. शरण्या देवकर
३. तस्मई अरगडे
४. रिया चोरडिया
५. अनुष्का कुलकर्णी
आर्टिस्टिक पेअर – मुली (१४-२० वर्षे)
१. श्रावणी रासकर – रिया चोरडिया
२. शरण्या देवकर – तस्मई अरगडे
- ३. आसावरी शेळके – आर्या सातपुते
४. रुचा साथिया – इरा परांजपे
५. आर्या आनंद – शर्वरी खेडेकर
आर्टिस्टिक पेअर – मुले (१४-२० वर्षे)
१. अरविंद सबावत – आयुष महतो
२. अर्चित वरगडे – संकल्प पाटील
३. सूर्या मोहोळ – सक्षम गायकवाड
१० ते १४ वयोगट :
पारंपरिक मुली :
१. निरल वाडेकर
२. अश्विका हिंगे
३. सोहा शहा
४. अदिती माने
५. अदिती तोरसकर
पारंपरिक मुले :
१. आदित्य शितोळे
२. लविंदरसिंग बसिन
३. रुद्र इंगळे
४. आदित्य कोंडे
५. तुषार दराडे
आर्टिस्टिक पेअर – मुली :
१. निरल वाडेकर – देलिषा
२. सान्वी – रिया
३. ऐशानी – अस्मी
४. अश्विका – सोहा
५. अदिती माने – अदिती तोरसकर
आर्टिस्टिक पेअर – मुले :
१. अबीर जोशी – निधीश तरळकेर
२. आदित्य कोंडे – हिमांशू शिळिमकर
३. लविंदर – आदित्य शितोळे
४. शिवराज – प्रथमेश
