
भारतीय महिला संघाने नुकताच २०२५ चा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारताने यापूर्वी भारताने २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु विजय मिळवता आला नव्हता.या स्पर्धेत ही भारतीय संघाला लीग स्टेजमध्ये सलग तीन सामने गमवावे लागले होते. मात्र, त्यांचा स्वतःवर विश्वास होता. सलग तीन सामने गमावलेले असताना पण त्यांना माहित होतं की या संघात काहीतरी खास करण्याची क्षमता आहे. या यशाच श्रेय संघातील प्रत्येक सदस्याला जातं.”
“त्या सकारात्मक राहिल्या, पुढील सामन्यांमध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे त्यांना माहित होतं. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. आणि तीच मेहनत कामी आली.
खरं सांगायचं तर तुम्ही फक्त वर्ल्डकप जिंकला नाही तर कित्येक मुलींना पुन्हा बॅट आणि बॉल उचलण्यासाठी प्रेरणा बनल्या आहात. मुली कुठं क्रिकेट खेळतात कां? मुलींचं क्रिकेट सामना कोण पाहता कां? अश्या असंख्य प्रश्नांना तुम्ही तुमच्या उत्तुंग कर्तृत्वनाने उत्तर दिल आहे. मुंबईत पुरुषांचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. मात्र पहिल्यांदाच धोधो पडणाऱ्या पावसात मुंबईमधील डी वाय पाटील स्टेडियम गच्च भरलं होत.
तब्बल 45,000 क्षमतेचे स्टेडियम असतानाही ते काही दिवस आधीच ‘हाऊसफुल’ झालं.
अनेकजण तर सामना सुरू झाल्यावरही कुठे तिकिटं मिळतायत का हे पाहण्याच्या प्रयत्नात होते.क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच महिलांच्या एखाद्या मॅचची तिकिटं मिळवणं एवढं कठीण बनलं होतं. महिला क्रिकेटला असा पाठिंबा मिळणं हे एकप्रकारे बदलाचं लक्षण आहे.
तसं मुंबईत कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी लोक एरवीही बऱ्यापैकी गर्दी करतात. पण नवी मुंबईत महिलांच्या मॅचसाठी पहिल्यांदाच लोक दूरदूरवरून आले होते. हळू हळू कां होईना चित्र बदलतंय. त्यामुळे तुम्ही फक्त वर्ल्डकप नाही जिंकला तर कित्येक मुलींना नवं स्वप्न, नवी प्रेरणा, आणि आदर्श दिला आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.