
पिंपरी-चिंचवड : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रो, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो स्थानक परिसरात रिक्षा फीडर सेवेचा शुभारंभ करण्यात आला. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले.
मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी सहज आणि माफक दरात रिक्षा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे मेट्रो आणि रिक्षा या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या वेळी आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, महामेट्रोचे कार्यकारी संचालक राजेश द्विवेदी, पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह रिक्षाचालक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच मेट्रो आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “मेट्रो सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी मेट्रो स्थानकापासून पुढील प्रवासाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मेट्रोमधून उतरल्यानंतर प्रवाशाला सहज आणि माफक दरात रिक्षा मिळाल्यास मेट्रो आणि रिक्षा या दोन्ही सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढेल.”
रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा नाकारू नये, मीटरप्रमाणे किंवा निश्चित आणि माफक दराने सेवा द्यावी, तसेच शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन हर्डीकर यांनी केले. अशा प्रकारच्या समन्वित वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासी आणि रिक्षाचालक या दोघांनाही फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिक्षा फीडर सेवेमुळे मेट्रो स्थानकांपासून परिसरातील विविध भागांमध्ये प्रवाशांना सहज पोहोचता येणार असून, मेट्रोच्या ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ला यामुळे मोठी मदत होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठीही ही सेवा महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.ट्रो आणि रिक्षा या दोन्ही सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढेल. रिक्षाचालकांनी प्रवासी भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे किंवा निश्चित, माफक दराने सेवा द्यावी आणि शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक या दोघांनाही फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.