मोकाट जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा; पशुवैद्यकीय सुविधांना स्थायी समितीची मंजुरी

पुणे, दि. १५ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह पुणे शहरातील भटक्या आणि मोकाट जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा तसेच विविध पशुवैद्यकीय सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी यासंदर्भातील ठराव मांडला होता.

या प्रस्तावामध्ये आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, लसीकरण केंद्र, चारा बँक, पुनर्वसन व संगोपन केंद्र उभारण्याचा समावेश आहे. प्रस्तावावर संबंधित विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला होता. विभागाकडून सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या ठरावास मंजुरी देण्यात आली.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक आणि शहरात मोकाट जनावरांची संख्या यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्याचबरोबर या जनावरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंजूर प्रस्तावानुसार शहर तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोकाट जनावरांसाठी योग्य निवारा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्यावर आवश्यक पशुवैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. तसेच लसीकरण, चारा व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, पुनर्वसन आणि संगोपन यासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना सुहास टिंगरे म्हणाले, “मोकाट जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा समतोल साधणे आवश्यक आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास दिलेली मान्यता हा त्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. आता प्रशासनाने या निर्णयाची प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी करून आवश्यक सुविधा उभाराव्यात.”

या निर्णयामुळे मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांना निर्माण होणारा धोका कमी करण्यास मदत होण्याबरोबरच भटक्या जनावरांच्या आरोग्य व संरक्षणासाठीही सक्षम व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button