# Puneri Awazz > Puneri Awazz ## Posts - [उंड्री–महादेववाडीत शिवसेनेच्या कामाला नागरिकांची पावती; ‘शिवसेना हाच विकासाचा आधार’ असा ठाम निर्धार](https://puneriawazz.in/?p=4047): उंड्री गावठाण, भितांडे वस्ती, कामठे वस्ती आणि होले वस्ती परिसरात शिवसेनेच्या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रत्येक गल्ली, चौक आणि घराघरांतून शिवसेनेच्या कामाबद्दल समाधान आणि विश्वास व्यक्त होत असून, “काम तर दिसतंय नाना” अशा शब्दांत नागरिक आपुलकीनं भावना व्यक्त करत आहेत. थेट संवादातून मिळणारी ही सकारात्मक प्रतिक्रिया आणि विश्वास कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढवत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, व्यापारी आणि कामगार वर्ग यांचं म्हणणं एकच आहे — रस्त्यांची दुरुस्ती झाली, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला, ड्रेनेजची कामं मार्गी लागली आणि परिसरातील सुरक्षितता वाढली. “बोलायची गरज नाही, आम्ही रोज अनुभवतोय” असं नागरिक अभिमानानं सांगत असून, ही शिवसेनेच्या विकासकामांची खरी पावती […] - [कोथरुडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का; युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश](https://puneriawazz.in/?p=4044): पुणे दि 8 : कोथरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुडचे युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदे यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशावेळी भाजपचे सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, महेश पवळे, संतोष बराटे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कार्यक्षम नेतृत्वाने प्रेरित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रवेशामुळे कोथरुडमधील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त […] - [प्रभाग २५ मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’; मताधिक्याने विजयासाठी संघटना सज्ज](https://puneriawazz.in/?p=4040): प्रभाग २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या प्रभागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित निवडणूक रिंगणात आहेत. विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि सूक्ष्म पातळीवरील नियोजन या त्रिसूत्रीवर भाजपाचा प्रचार सुरू आहे. या संदर्भात बोलताना भाजपाचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक म्हणाले, “आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपा प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून उभी राहिलेली संघटनात्मक फळी, निवडणुकीचे प्रभावी मायक्रो मॅनेजमेंट आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते यांच्या बळावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा आमचा निर्धार आहे.” या विजयासाठी प्रभाग २५ चे […] - [काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश; कसबा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग](https://puneriawazz.in/?p=4037): पुणे, : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कसबा मतदारसंघातील वरिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व तसेच पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राजेश येनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रवेशावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सुधीर काळे हे उशिरा भाजपमध्ये आले असले तरी त्यांनी पक्षात यावे, अशी आमची कायम इच्छा होती. निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन […] - [अजित पवारांच्या सत्ताकाळात मेट्रो एक इंचही पुढे गेली नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ](https://puneriawazz.in/?p=4034): पुणे : दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर पुण्यात मेट्रो आणण्याची चर्चा २००१ पासून सुरू होती. मात्र २००१ ते २०१४ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात पुणे मेट्रोचे काम एक इंचही पुढे गेले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतानाही मेट्रो केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली, असे ते म्हणाले. अजित पवारांकडून मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून ही पुणेकरांची दिशाभूल आहे, असा आरोप करत मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचा विश्वास नाही का? असा सवालही उपस्थित केला. गुरुवारी मोहोळ यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत प्रवाशांशी संवाद […] - [प्रभाग २४ अधिक सुरक्षित : गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मजबूत सुरक्षा कवच](https://puneriawazz.in/?p=4031): पुणे दि 8 : प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या आधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसला असून संपूर्ण प्रभागाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम झाली आहे.प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांकडून या सीसीटीव्ही यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल या मध्यवर्ती भागातील २४ प्रमुख चौक, ६० मोक्याची ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम, बस थांबे अशा गर्दीच्या ठिकाणांची काळजीपूर्वक निवड करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.या उपक्रमामुळे […] - [गरीब मुलींची फी माफ करून दादांनी अतिशय उत्तम काम केले – म्हाळुंग्यातील नागरिकांकडून चंद्रकांतदादांप्रति कृतज्ञता](https://puneriawazz.in/?p=4028): पुणे दि. 8 : “दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करून अतिशय उत्तम काम केले!” अशा शब्दांत म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अशा सकारात्मक प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना चंद्रकांतदादांनी व्यक्त केली.प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी व्हीटीपी ब्लेअर येथील सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी देशात व राज्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी सोसायटीतील रहिवासी शिरीष भावसार यांनी चंद्रकांतदादांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल […] - [सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; औंध–बोपोडीत प्रचाराला गती](https://puneriawazz.in/?p=4025): पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या वतीने आज बोपोडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.सकाळच्या सत्रात औंध येथील सानेवाडी आय.टी.आय. रोड परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तर सायंकाळी बोपोडीतील मानाजी बाग, भोईटे वस्ती परिसरात प्रचार करण्यात आला.या वेळी मूलभूत विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक […] - [मुंबई मंथनमध्ये अनपेक्षित भेट; एकनाथ शिंदे–संजय राऊत आमनेसामने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण](https://puneriawazz.in/?p=4022): मुंबई, दि. ८ : मुंबईत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या ‘मुंबई मंथन’ या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात शिंदे यांची मुलाखत संपून ते बाहेर पडत असतानाच, संजय राऊत मुलाखतीसाठी स्टुडिओकडे जात होते. यावेळी दोघेही समोरासमोर आले. एकमेकांना पाहताच दोन्ही नेत्यांनी थांबून अभिवादन केले. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. राऊत अलीकडेच आजारपणातून बरे झाले असून, या सौजन्यपूर्ण संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. दोघांमध्ये साधारण एक ते दोन मिनिटे औपचारिक चर्चा झाली. राजकीय मतभेद […] - [“लांडग्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही” — अजित पवारांवरील टीकेला आमोल मिटकरींचे आक्रमक प्रत्युत्तर](https://puneriawazz.in/?p=4019): पुणे,  दि. ८  : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमोल मिटकरी यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. आमोल मिटकरी यांनी महेश लांडगे यांचे नाव न घेता टीका करताना म्हटले की, “आम्ही लांडग्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही.” त्यांनी शरद पवार यांची तुलना ‘सिंहा’शी तर अजित पवार यांची तुलना ‘वाघा’शी करत, पक्षातील नेतृत्व किती ताकदवान आहे हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले. मिटकरी पुढे म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि मोठे नेते […] - [पुण्यात ऐन निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; वडगाव शेरीत राडा, सोपाननगरमध्ये दगडफेक](https://puneriawazz.in/?p=4016): पुणे,  दि. ८  : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वडगाव शेरी आणि सोपाननगर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव शेरी परिसरात रविवारी रात्री प्रचाराच्या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही वेळातच उग्र रूप धारण करत हाणामारीत आणि राड्यात परिवर्तित झाला. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेत काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, सोपाननगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर […] - [पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची व लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार](https://puneriawazz.in/?p=4014): मुंबई, दि. ८ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून, पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची आणि लोकसहभागाची प्रभावी जोड देणारे एक समर्पित व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा याचा वस्तुपाठ डॉ. माधव गाडगीळ यांनी समाजाला दिला. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नसून मानवी अस्तित्वाचा आधार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव राहिला असून ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी […] - [रोजगारनिर्मितीसाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारणार : आबा बागुल](https://puneriawazz.in/?p=4009): पुणे, दि. 8 : महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारण्यात येणार असून, त्यामार्फत बचतगटांसह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली. प्रभाग क्रमांक ३६ मध्ये आबा बागुल यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक मतदारांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सकाळी दुचाकी रॅली व पदयात्रेद्वारे आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना […] - [ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन, पर्यावरण चळवळीला मोठी हानी](https://puneriawazz.in/?p=4006): पुणे दि. 8 : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. माधव गाडगीळ हे भारतातील अग्रगण्य पर्यावरण अभ्यासक मानले जात होते. पश्चिम घाट संवर्धन अहवाल, जैवविविधता संरक्षण, पर्यावरणीय धोरणे आणि शाश्वत विकास या क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संशोधन, लेखन आणि जनजागृतीचे कार्य केले. त्यांच्या जाण्याने देशातील पर्यावरण चळवळीला मोठी हानी […] - [पणजीत ९ ते ११ जानेवारी दरम्यान २१ वे जागतिक मराठी संमेलन; ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेतून जागतिक मराठी एकत्र](https://puneriawazz.in/?p=4003): पणजी, दि. ७ : जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमी, पणजी येथे दिनांक ९, १० व ११ जानेवारी २०२५ रोजी २१ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संमेलनाच्या सविस्तर कार्यक्रमाची माहिती आज जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, कार्याध्यक्ष उदयदादा लाड आणि कार्यकारणी सदस्य जयराज साळगावकर यांनी दिली. संमेलनाची सुरुवात दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या उद्घाटन सत्राने होणार असून, यामध्ये नामवंत अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटीश नंदी संवाद साधणार […] - [VLSID 26 पुरस्कार सोहळ्यात ‘भारतातील सुपरकॉम्प्युटिंगचे जनक’ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार](https://puneriawazz.in/?p=4000): पुणे : भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या VLSID 26 पुरस्कार सोहळ्यात व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय पी. भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. PARAM मालिकेतील महासंगणकांची उभारणी, तसेच देशात VLSI आणि उच्च-कार्यक्षमता संगणन (HPC) क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे डॉ. भटकर यांना “भारतातील सुपरकॉम्प्युटिंगचे जनक” म्हणून ओळखले जाते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी VLSID 26 आयोजन समितीचे प्रमुख सदस्य शैलेश परब, वीरेश शेट्टी, सुमित गोस्वामी, हेमंत माने, महेश बुटाला, संजय घोरपडे आणि रंजित येवले उपस्थित होते. या सन्मानाद्वारे सेमीकंडक्टर डिझाइन, संशोधन आणि […] - [भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचे षड्यंत्र; पैसे, दहशत व सत्तेचा गैरवापर – ॲड. असीम सरोदे](https://puneriawazz.in/?p=3997): पुणे, ७ : महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पैसे, दहशत आणि सत्तेचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी काँग्रेस शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने तसेच तक्रारदार समीर गांधी उपस्थित होते. ॲड. सरोदे यांनी सांगितले की, बिनविरोध निवडणुकांच्या प्रक्रियेविरोधात समीर गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. संसदीय लोकशाहीच्या ७० वर्षांच्या इतिहासात संसदेत अवघे ३० ते ३२ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार […] - [उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार – राघवेंद्र बाप्पु मानकर](https://puneriawazz.in/?p=3994): पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान व साठे उद्यान येथे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांशी […] - [पुणे–पिंपरी चिंचवडच्या ढासळलेल्या व्यवस्थेवर अजितदादांचा ‘अलार्म’; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नवी रणनीती](https://puneriawazz.in/?p=3991): पुणे, दि. ७ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील ढासळलेल्या नागरी व्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त करत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी “अलार्म” या संकल्पनेवर आधारित व्यापक प्रचार मोहीम जाहीर केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी हेच या मोहिमेचे केंद्रबिंदू असून, ही केवळ गैरसोयींची नोंद नसून महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचा थेट इशारा असल्याचे या अभियानातून स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आलेल्या व्यापक ग्राउंड सर्वेक्षणां आणि थेट जनसंवादातून प्राप्त तक्रारींवर ही मोहीम आधारित आहे. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणे, दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग, वाढता वायू प्रदूषण निर्देशांक (AQI), तसेच वाहतूक […] - [पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाला दोन दशकांची पूर्तता; जपानच्या ओकायामा शिष्टमंडळाची सदिच्छा भेट](https://puneriawazz.in/?p=3988): पुणे महानगरपालिकेच्या स्व. पु.ल. देशपांडे उद्यान अर्थात पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या निर्मितीस दोन दशकांची पूर्तता झाल्याच्या निमित्ताने जपानच्या ओकायामा शहरातील शिष्टमंडळाने मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता उद्यानास सदिच्छा भेट दिली.हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) मा. श्रीमती पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ओकायामा जपानचे शिष्टमंडळ, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधी तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्यानामध्ये केक कापून पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या द्वीदशकपूर्तीचा आनंद साजरा करण्यात आला. भारत–जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या या उद्यानाने गेल्या २० वर्षांत पुणेकरांना निसर्गसौंदर्य, जपानी संस्कृतीची अनुभूती आणि शांततेचे वातावरण दिले असल्याचे यावेळी मान्यवरांनी […] - [पुण्यासाठी १,००० ई-बस, मेट्रोचा १५० किमीपर्यंत विस्तार; भाजपच्या संकल्पपत्रात विकासाचा रोडमॅप](https://puneriawazz.in/?p=3985): पुणे, दि 7 : पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून पुणे शहर अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा “विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र” केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, […] - [सत्तेपेक्षा सेवा मोठी; २५ वर्षे ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच ओळख जपणारे गणेश बिडकर](https://puneriawazz.in/?p=3982): पुणे दि 7 :सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांनी २५ वर्षांचा विश्वासाचा आणि सेवाभावाचा प्रवास पूर्ण केला आहे. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी विविध महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांनी कायम सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली. सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची मानणाऱ्या या नेतृत्वामुळेच आजही ते नागरिकांचे ‘आपले माणूस’ म्हणून ओळखले जातात.प्रभागातील कोणतेही प्रश्न असोत, नागरिकांनी हाक दिली की ते घरातील सदस्याप्रमाणे तत्काळ धावून जातात. वडिलांकडून जपलेली माणसांची नाती त्यांनी आजही तितक्याच आपुलकीने जपली आहेत. त्यांच्या साधेपणामुळे आणि सततच्या उपस्थितीमुळे प्रभागात त्यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.प्रभाग क्रमांक २४ (कसबा पेठ परिसर) मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले गणेश बिडकर २००२ साली प्रथमच नगरसेवक […] - [प्रभाग २२ मधील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी चमणशाह दर्ग्यात चादर अर्पण करून प्रचाराची सुरुवात](https://puneriawazz.in/?p=3979): पुणे, दि. 7 : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांनी आज प्रचाराची सुरुवात सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देत काशेवाडी येथील हजरत चमणशाह दर्ग्यात चादर अर्पण करून केली.या वेळी सर्वधर्मीय समाजबांधवांनी एकत्र येत सामूहिक दर्शन घेतले. मुस्लिम समाजातील महिलांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शविला.यानंतर काशेवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान हातगाडी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते तसेच पथारी व्यावसायिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांशी मुक्त संवाद साधत विकास व मूलभूत प्रश्नांवर […] - [लोकसहभागातून विकासाचा नवा आदर्श : सनी विनायक निम्हण](https://puneriawazz.in/?p=3976): पुणे :लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची मोठी जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना राबवणे आणि लोकांशी थेट संवाद ठेवणे, हीच लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित भूमिका असते. मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित, आधुनिक दृष्टिकोन असलेला आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असतो, तेव्हा विकासाची दिशा अधिक परिणामकारक ठरते. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन पुण्यात सक्रिय समाजकारणातून राजकारणात उतरलेले सनी विनायक निम्हण हे याचे ठळक उदाहरण आहेत.कल्पक विचार, स्पष्ट धोरण आणि लोकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत सनी निम्हण काम करत आहेत. लोकांच्या सहभागातूनच आदर्श प्रभाग आणि सक्षम समाज घडू शकतो, ही त्यांची ठाम भूमिका असून त्याच विचारधारेतून त्यांची […] - [दिव्यांगांच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक – सचिव तुकाराम मुंढे](https://puneriawazz.in/?p=3973): पुणे, दि. ७ : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित आणि संशोधनाधारित सर्वसमावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी अत्यंत आवश्यक असून, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केले. नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डीफ (एनसीईडी) महाराष्ट्र आणि अली यावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित ‘दिव्यांगतेच्या दृष्टिकोनातून व संशोधनाच्या आधारे समावेशक शिक्षण’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अली यावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार, एनसीईडीच्या अध्यक्षा डॉ. मीरा सुरेश, कॉक्लिआ संस्थेचे मुख्य विश्वस्त […] - [वाघोलीत धक्कादायक घटना : १७ वर्षीय अमन सिंगची ओळखीच्या अल्पवयीन मुलीकडून साथीदारांच्या मदतीने हत्या](https://puneriawazz.in/?p=3969): पुणे : पुण्याच्या वाघोली परिसरात एक धक्कादायक आणि गंभीर गुन्ह्याची घटना समोर आली असून, १७ वर्षीय अमन सिंग याची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, ही हत्या अमनच्या ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीने तिच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमन आणि संबंधित मुलगी यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. काही सूत्रांच्या माहितीनुसार हा वाद प्रेमप्रकरणाच्या संशयातून किंवा जुन्या वैयक्तिक मतभेदांतून वाढत गेला असावा. या वादातूनच अमनचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचे बोलले जात आहे. आरोपी अल्पवयीन मुलीने अमनला एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. अमन तेथे पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या तिच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार […] - [“ड्रायव्हर एकता दिखायेगा! इलेक्शन में सबक सिखायेगा!!” – परिवहन विभागाविरोधात रिक्षा व कॅब चालकांचा राज्यव्यापी उघड निषेध](https://puneriawazz.in/?p=3966): पुणे, दि. 7 : राज्यभरातील रिक्षा व कॅब चालकांनी परिवहन विभागाच्या धोरणांविरोधात उघड निषेध सुरू केला असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये परिवहन मंत्र्यांना धडा शिकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.“ड्रायव्हर एकता दिखायेगा! इलेक्शन में सबक सिखायेगा!!” असा ठळक संदेश असलेले पोस्टर्स रिक्षा व कॅब वाहनांवर लावून चालकांनी आपला रोष लोकशाही मार्गाने जनतेपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. हा निषेध कोणत्याही एका शहरापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा व कॅब चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. परिवहन विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे, भ्रष्टाचारामुळे तसेच चालकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे चालकांचे जीवनमान मोठ्या अडचणीत सापडले आहे. पॅनिक बटन, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग […] - [नवीन वर्षात मुक्ता बर्वेची खास भेट; ‘माया’ची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड](https://puneriawazz.in/?p=3963): पुणे, दि. 7  मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि प्रयोगशील सिनेमांची परंपरा अधिक बळकट होत असताना, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास चित्रपटाच्या माध्यमातून करत आहे. नेहमीच दमदार आणि वेगळ्या भूमिका साकारणारी मुक्ता बर्वे आता ‘माया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, येत्या २७ फेब्रुवारीला ‘माया’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘माया’ या चित्रपटात मुक्ता बर्वे प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत झळकणार आहे. पोस्टरमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक यांची तगडी कलाकारांची फळी दिसून येते. चित्रपटाच्या पोस्टरमधूनच वेगळ्या आशयाची […] - [स्वयंसहाय्यता समूहांच्या कर्जपुरवठ्यास गती देण्यासाठी पुण्यात जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक प्रशिक्षण संपन्न](https://puneriawazz.in/?p=3960): पुणे, दि. ६ जानेवारी २०२६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना (SHG) बँकांमार्फत सुलभ आणि प्रभावी कर्जपुरवठा व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय अनिवासी बँक व्यवस्थापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध बँक शाखांमधील एकूण १९३ बँक व्यवस्थापकांनी सहभाग घेतला. उमेद अभियानांतर्गत महिलांच्या यशोगाथा, ‘लखपती दिदी’ंचे प्रेरणादायी मनोगत, बीसी सखींचे अनुभव आणि माहितीपर चित्रफिती सादर करून बँकर्सना प्रत्यक्ष क्षेत्रातील सकारात्मक परिणामांची ओळख करून देण्यात आली. कार्यशाळेत लखपती दिदी, लघुउद्योजक महिला, शेती व बिगर शेतीवर आधारित उपक्रम, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून महिलांना कर्जपुरवठा करताना आवश्यक असलेली कार्यवाही, […] - [‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गावर व्यापक स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी](https://puneriawazz.in/?p=3957): पुणे, दि. 7 : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे जिल्ह्यातून होत असून स्पर्धेचा संपूर्ण मार्ग व त्यावरील गावे देश-विदेशात थेट दूरचित्रवाहिनीद्वारे दाखवली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर संपूर्ण स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सुक्ष्म नियोजन करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या, गणेश मंडळे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्यासह मोहिमस्तरावर स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’च्या टप्पा क्रमांक दोनच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज संपूर्ण स्पर्धा मार्गाची गावनिहाय पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार शंकर मांडेकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, हवेलीचे […] - [सीडीएस २०२६ तयारीसाठी नाशिक येथे तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती](https://puneriawazz.in/?p=3954): पुणे, दि.7 : यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएस)–२०२६ च्या तयारीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान (भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांसाठी पात्र शिक्षकांची निवड केली जाणार असून, त्यांना ३०० रुपये प्रती तासिका मानधन देण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह छात्रपूर्व प्रशिक्षण […] - [कोथरूडमध्ये बदलाची चाहूल! प्रभाग ११ (ब) मधून आम आदमी पार्टीच्या पत्रकार जयश्री डिंबळे निवडणूक रिंगणात](https://puneriawazz.in/?p=3951): पुणे दि. 7 : कोथरूड विधानसभा परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये आता राजकीय बदलाची लाट स्पष्टपणे जाणवू लागली आहे. आम आदमी पार्टीकडून निर्भीड पत्रकार आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या सौ. जयश्री डिंबळे यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता, मूलभूत नागरी सुविधा आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या जयश्री डिंबळे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.“काम बोलणार, आश्वासन नाही” या ठाम भूमिकेसह त्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. कोथरूड परिसरातील शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगारहमी, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता आणि […] - [पुण्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारे लोकनेते सुरेश कलमाडी यांचे निधन, पुणेकरांच्या मनाला चटका](https://puneriawazz.in/?p=3944): पुणे : पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय कला, क्रीडा, उद्योग आणि पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणारे दूरदृष्टीचे लोकनेते, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन पुणेकरांच्या मनाला चटका लावून गेले आहे. पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, त्यांच्या जाण्याने शहराने एक अनुभवी नेतृत्व गमावले आहे. पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यांसारखे उपक्रम त्यांनी केवळ सुरूच केले नाहीत, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. हे सर्व उपक्रम आजही सातत्याने आणि यशस्वीपणे सुरू आहेत, हे त्यांच्या सक्षम नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे. ‘उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र ते चालवणे अवघड असते,’ असे ते […] - [प्रभाग २५ मध्ये राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा घरोघरी संपर्क दौरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://puneriawazz.in/?p=3941): पुणे : प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी शनिवारी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या संपर्क दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले. हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील इतर भागांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालय आणि ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ या उपक्रमांमधून झालेल्या कामांचे कौतुक करत, भविष्यात अधिक विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली. या प्रचार […] - [प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश](https://puneriawazz.in/?p=3937): पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या विकासावर केलेल्या विधानांना महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पुणे शहराचा गेल्या काही वर्षांत मोठा कायापालट झाला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व विकास झाला आहे. हे वास्तव अजित पवार खासगीतही मान्य करतील, असा दावा बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या काळात राबविण्यात आलेल्या विकास योजनांची सविस्तर यादी आपण अजित पवार यांना पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे नाव घेऊन टीका करण्याचे कर्तृत्व अजित पवार यांनी दाखवू नये, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि भाजपचे माजी गटनेते गणेश बीडकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, […] - [प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश](https://puneriawazz.in/?p=3933): पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रमुख नेत्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभागात मोठा राजकीय धक्का बसला असून, भाजपासाठी पोषक वातावरण अधिकच मजबूत झाले आहे. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या […] - [प्रभाग 22 हरकानगरमध्ये काँग्रेस–शिवसेना (उबाठा) उमेदवारांचे पदयात्रेद्वारे जल्लोषात स्वागत](https://puneriawazz.in/?p=3930): पुणे, दि.6: पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 22 मधील हरकानगर वसाहतीत अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख व दिलशाद शेख यांचे नागरिकांनी पुष्पहार अर्पण करत उत्साहात स्वागत केले. या प्रचार पदयात्रेची सुरुवात गोगादेव मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. पदयात्रेदरम्यान हरकानगर परिसरात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी उमेदवार इंदिरा अविनाश बागवे यांनी महिलांना बचत गट तसेच मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे आश्वासन दिले. महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य व पायाभूत […] - [माजी खासदार सुरेश कलमाडी यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली](https://puneriawazz.in/?p=3927): पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजप नेते ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोथरुड येथील सुरेश कलमाडी यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पुण्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीत सुरेश कलमाडी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. तसेच बालेवाडी क्रीडा संकुलाच्या उभारणीतून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने […] - [पुणे शहराला सर्वोत्तम करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ](https://puneriawazz.in/?p=3924): पुणे : भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुकीपुरता नव्हे तर वर्षभर २४ तास लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवायचे असेल तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असे ठाम मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री व पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा यांचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते […] - [फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे येथील स्ट्रॉबेरी शेताला भेट](https://puneriawazz.in/?p=3921): पुणे, दि. 6 : राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री. महादेव कोळी व श्री. परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. या भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची पद्धत, रोपवाटिका व्यवस्थापन, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली. स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन देत मंत्री गोगावले यांनी ओझर्डे परिसरात यशस्वी ठरत असलेल्या स्ट्रॉबेरी लागवडीचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, […] - [“लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील” — रवींद्र चव्हाणांच्या विधानाने राजकीय वाद, काँग्रेसचा तीव्र निषेध](https://puneriawazz.in/?p=3919): पुणे दि. ६ :  आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी लातूर येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून चव्हाण म्हणाले, “तुमचा उत्साह बघता, लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी १०० टक्के पुसल्या जातील यात शंका नाही.” हे विधान त्यांनी कार्यकर्त्यांना घोषणा देण्याचे आवाहन केल्यानंतर केले. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र व आमदार अमित देशमुख यांनी या विधानाचा निषेध करत ते दुर्दैवी, […] - [कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’ नियम मोडायला आली ‘कामिनी’!](https://puneriawazz.in/?p=3916): पुणे दि. ६ :  कुरळे ब्रदर्ससाठी आयुष्य म्हणजे नियम, शिस्त आणि एकच ठाम तत्त्व – ‘नो लेडीज, नो मॅरेज’. स्त्रियांपासून चार हात लांब राहणाऱ्या या भावांच्या आयुष्यात जर एका बिनधास्त स्त्रीची एंट्री झाली, तर काय होणार? हाच मजेशीर गोंधळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या आगामी मराठी चित्रपटात. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये रतन, मदन, चंदन आणि बबन या कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात कामिनीची एंट्री होते आणि त्यांच्या ठरवून ठेवलेल्या नियमांना जबरदस्त धक्का बसतो. कामिनीच्या आगमनामुळे होणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोदाची धमाल झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात कामिनीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू साकारत आहे. शिस्तप्रिय आणि नियमबद्ध […] - [क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर सुपरहिट! पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची घवघवीत कमाई](https://puneriawazz.in/?p=3913): पुणे दि. ६ : मराठी शाळेच्या अस्मितेला प्रभावी आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने तब्बल ३.९१ कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल फलक झळकत असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये हरवलेले प्रेक्षक भावनिक होत चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशयघन कथा, वास्तववादी संवाद, भावनिक क्षण आणि प्रभावी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. सोशल मीडियावर तसेच बुक माय शोसारख्या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट सातत्याने ट्रेंडिंगमध्ये आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटावर […] - [अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवारमाजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली](https://puneriawazz.in/?p=3910): पुणे दि. ६ : माजी केंद्रीय मंत्री तसेच पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले ज्येष्ठ नेतृत्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशातून माजी खासदार सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात सांगितले की, भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष […] - [स्वयं पुनर्विकासातून झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देणार – आबा बागुल यांचा निर्धार](https://puneriawazz.in/?p=3907): पुणे, दि. 5 : स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला ‘आहे तिथे हक्काचे घर’ कायदेशीररित्या मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा ठाम निर्धार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि झोपडपट्टीवासीयांचे हित जोपासण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथील शाहू वसाहत येथे आयोजित प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आबा बागुल यांच्यासह पॅनलमधील तीनही उमेदवार उपस्थित होते. सभेत नागरिकांनी एसआरए योजनेतील अनागोंदी, विलंब आणि अन्यायकारक कारभाराबाबत आपली व्यथा मांडली. त्यावर बोलताना आबा बागुल […] - [वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे; ‘केस नं. ७३’मधील तडफदार भूमिकेची उत्सुकता](https://puneriawazz.in/?p=3904): पुणे दि. 5:   विविध मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘केस नं. ७३’ मध्ये ती एका प्रामाणिक, निर्भीड आणि तत्वनिष्ठ क्रिमिनल वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून, सत्यासाठीचा तिचा हा लढा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना राजसी भावे सांगते,“मधुरा इनामदार ही अतिशय प्रामाणिक आणि ठाम मतांची वकील आहे. तिच्या प्रवेशानंतर ‘केस नं. ७३’ मधील गुंता कसा उलगडतो, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. सातत्याने घडणाऱ्या हत्यांचं सत्रनाट्य जेव्हा कोर्टापर्यंत पोहोचतं, तेव्हा एक तडफदार वकील म्हणून सत्य उघड करताना माझ्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू प्रेक्षकांना […] - [पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा : सनी विनायक निम्हण](https://puneriawazz.in/?p=3900): पुणे दि. 5:  पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारे सनी निम्हण हे आज पुण्यातील एक आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. औंध–बोपोडी परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचा राजकीय व सामाजिक वारसा लाभलेले सनी निम्हण हे सुरुवातीपासूनच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. […] - [वस्तीभागातील तरुणांसाठी ‘आशेचा किरण’ ठरले गणेश बिडकरांचे लाईट हाऊस प्रोजेक्ट; १५००हून अधिक तरुणांच्या आयुष्यात उजळले भविष्य](https://puneriawazz.in/?p=3897): पुणे दि. 5: वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख व प्रभाग २४ ‘ड’ चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम आज हजारो तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना योग्य दिशा देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी त्यांच्यात विविध कला, कौशल्ये आणि मेहनतीची जिद्द असते. हीच बाब लक्षात घेऊन, तरुणांच्या कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने गणेश […] - [प्रभाग २५ मध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद; राघवेंद्र बाप्पू मानकरांसह सर्व उमेदवारांना नागरिकांचा भक्कम पाठिंबा](https://puneriawazz.in/?p=3894): पुणे दि. 5: प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली. आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेत उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. ‘प्रभाग २५ मधील पुणेकरांचा निर्धार, निवडून येणार भाजपचेच उमेदवार’ आणि ‘पुण्याची शान, भाजपचा मान; प्रभाग २५ चा वाढवू सन्मान’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कुमठेकर रस्ता, चित्रशाळा चौक, फडतरे चौक येथे पदयात्रा पोहोचताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पेरुगेट, पावन मारुती आणि लिमयेवाडी परिसरात नागरिकांनी घराच्या बाल्कनीतून उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत औक्षण करून स्वागत केले. नवजवान […] - [प्रभाग २६ मधील काँग्रेस उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://puneriawazz.in/?p=3891): पुणे दि. 5: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ समता भूमी–घोरपडे पेठ येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज प्रचाराची दमदार सुरुवात केली. रवी पाटोळे, अ‍ॅड. भावना बोराटे, संजीवनी बालगुडे आणि सईद सय्यद यांनी समता भूमी येथून प्रचाराला प्रारंभ केला. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक, महिला आणि युवकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः रिक्षावाले, पथारी व्यवसाय करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना उमेदवार रवी पाटोळे यांनी रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच या वसाहतीतील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक आणि तातडीने सोडवण्यात येतील, […] - [‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; २१०० रुपये व ‘लखपती बहीण’चे संकेत – जालन्यात शिंदे–फडणवीसांची मोठी घोषणा](https://puneriawazz.in/?p=3888): पुणे, दि. ५ :  राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा ठाम शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथील जाहीर सभेत दिला. “जोपर्यंत तुमचा हा लाडका भाऊ सत्तेत आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील,” असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत भविष्यात २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार योग्य वेळी केला जाईल, असे संकेत दिले. डिसेंबर २०२५ मधील हिवाळी अधिवेशनातही याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील सभेत बोलताना सरकारचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्पष्ट केले. “सरकार केवळ १५०० रुपये […] - [भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे ‘सीडीएस-६६’ पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम](https://puneriawazz.in/?p=3886): पुणे, दि. ५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ‘संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा’ (CDS) तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६६’ आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १८ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध असलेले सीडीएस-६६ अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच त्यासोबतची परिशिष्टे तीन प्रतींमध्ये भरून सादर करणे […] - [सेमीकंडक्टर उत्पादनात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो – VLSI सोसाइटीचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता](https://puneriawazz.in/?p=3883): पुणे, दि. 5: कंप्युटर, मोबाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो, असा ठाम विश्वास ‘वेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड’ (VLSI) सोसाइटीचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता यांनी व्यक्त केला. सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या VLSI सोसाइटीच्या वतीने पुण्यात ‘39 वी VLSI डिझाइन आंतरराष्ट्रीय परिषद 2026’ आणि ‘25 वी आंतरराष्ट्रीय एम्बेडेड सिस्टीम परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशभरातून 2,500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले असून 550 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. परिषदेच्या उद्घाटनानंतर डॉ. सत्य गुप्ता यांच्यासह सोसाइटीचे पदाधिकारी शैलेश परब, रंजीत येवले आणि संजय घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद […] - [राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जागा बेकायदेशीर विक्रीत? विजय कुंभार यांचा पार्थ पवारांशी संबंधित नवा जमीन घोटाळा उघड](https://puneriawazz.in/?p=3881): पुणे, दि. 5: माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या संदर्भात आणखी एका कथित जमीन घोटाळ्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष कार्यालयाशी संबंधित जागेवरून कुंभार यांनी गंभीर आरोप केले आहेत. विजय कुंभार यांच्या दाव्यानुसार, पुण्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय कार्यरत आहे, ती जागा प्रत्यक्षात ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन’ या संस्थेच्या मालकीची आहे. या जागेसाठी धर्मादाय आयुक्तांनी केवळ भाडेपट्टा देण्याची परवानगी दिली होती. मात्र, संबंधित संस्थेच्या विश्वस्तांनी ही जागा परस्पर विकल्याचा गंभीर आरोप कुंभार यांनी केला आहे. दरम्यान, याआधी […] - [“हाच का दादांचा वादा?” पुण्यात अजित पवारांना प्रश्न विचारणाऱ्या बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापले](https://puneriawazz.in/?p=3878): पुणे, दि. 5: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेपूर्वी अचानक उभ्या राहिलेल्या बॅनर्समुळे मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात मतदारांनी थेट अजित पवारांनाच उद्देशून लावलेल्या या बॅनर्सवर “हाच का दादांचा वादा?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच “अवैध धंदे करणारे आणि जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार तुम्ही करणार का?” असा थेट आणि जहरी प्रश्न विचारण्यात आला आहे. या बॅनर्समुळे प्रभागात राजकीय चर्चांना उधाण आले असून, नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, त्यामागील राजकीय हेतूंबाबत विविध तर्कवितर्क […] - [आधी स्वतःच्या गिरेबानात डोकावा” – पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रुपाली ठोंबरे पाटील यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल](https://puneriawazz.in/?p=3875): पुणे, दि. 5:   पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या आणि उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्यापूर्वी “आधी स्वतःच्या गिरेबानात डोकावून पाहावे,” असा थेट इशारा त्यांनी दिला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठोंबरे पाटील म्हणाल्या की, भाजपने विनाकारण टीका केली नसती तर प्रत्युत्तर देण्याची वेळच आली नसती. निवडणुकीच्या काळात मुद्दाम समाजात वाद निर्माण करणे, तेढ वाढवणे आणि सत्तेचा गैरवापर करणे ही भाजपची जुनी कार्यपद्धती असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले […] - [बीडमध्ये रील स्टार गणेश डोंगरेचा भीषण अपघातात मृत्यू; ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर उलटून जागीच निधन](https://puneriawazz.in/?p=3872): पुणे, दि. 5:  बीड जिल्ह्यातील सोशल मीडिया विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, Instagram वर रील्समुळे लोकप्रिय असलेला रील स्टार गणेश डोंगरे याचा ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही परिसरात हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डोंगरे हा आपल्या ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करत होता. याच दरम्यान ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली अचानक उलटली आणि ती थेट गणेश डोंगरेच्या अंगावर पडली. या गंभीर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश डोंगरे हा सोशल मीडियावर, विशेषतः Instagram Reels वर आपल्या विनोदी, ग्रामीण जीवनावर आधारित व्हिडिओंमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. अल्पावधीतच त्याने हजारो चाहत्यांची फळी निर्माण केली होती. त्याच्या आकस्मिक […] - [प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प सभा उत्साहात; अमोल बालवडकरांचे स्फोटक भाषण, अजित पवारांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल](https://puneriawazz.in/?p=3869): पुणे, दि. 5: प्रभाग क्रमांक ९ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी संकल्प सभा प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेला कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण सभास्थळावर जोशपूर्ण वातावरण होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल रतन बालवडकर यांच्या भावनिक आणि आक्रमक भाषणाने सभेला वेगळीच धार मिळाली. गेली अकरा वर्षे तन-मन-धन अर्पण करून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारून कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय हत्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी नाकारल्यानंतर “घरी कसे जायचे, आई-वडिलांना काय सांगायचे?” असा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी त्या काळातील […] - [ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणार – शिवसेना उमेदवार आबा बागुल यांची ग्वाही](https://puneriawazz.in/?p=3866): पुणे, दि. 5: तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच वाळवेकर लॉन येथे आयोजित संवाद कार्यक्रमात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह पॅनलमधील बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी आणि नयना नितीन लगस यांनी तळजाई टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी “विकासासाठी शिवसेनेचे धोरण कणखर आहे” यावर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ […] - [सिंधुताईंचे कार्य वटवृक्षांसारखे; समाजसेवेच्या मुळांना बळ देणारे – पद्मश्री गिरीश प्रभूणे](https://puneriawazz.in/?p=3863): पुणे : सिंधुताई सपकाळ या केवळ व्यक्ती नव्हत्या, तर त्या करुणेचा अखंड झरा होत्या. स्वतः सेवेत कार्यरत राहून त्यांनी अनेकांच्या कार्यालाही दिशा आणि ऊर्जा दिली. समाजसेवेत काम करत असताना लोकांशी मदत मागण्याची ताकद त्यांनी दिली आणि त्यामुळेच माझा प्रवास इथपर्यंत पोहोचला. सिंधुताईंचे कार्य हे वटवृक्षांसारखे असून त्याच्या खोलवर रुजलेल्या मुळांनी समाजाला आधार दिला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘माई परिवार’ तर्फे सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या […] - [प्रभाग २५ मध्ये भाजपाची भव्य पदयात्रा; आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मानकर–बापट–टिळक–पंडित यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://puneriawazz.in/?p=3860): पुणे : प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांच्या प्रचारार्थ आज एक भव्य आणि उत्साहपूर्ण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला आमदार हेमंतजी रासने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पदयात्रेची सुरुवात पंतांचा गोट येथून झाली. पुढे ही पदयात्रा ज्ञानप्रबोधिनी, सोनवणे चाळ, राजाराम मंडळ खालकर तालीम, कुमठेकर रोड, चित्रशाळा चौक, सदाशिवपेठ हौद, फडतरे चौक, गाडगीळ रस्ता, नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी, निंबाळकर तालीम, पेरुगेट, पावन मारुती, लिमयेवाडी, शेडगे आळी, टिळक रोड, खजिना महाल, चिमण्या गणपती, देशमुखवाडी आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी […] - [डायस प्लॉट वसाहतीत काँग्रेस–शिवसेना (ठाकरे) उमेदवारांचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत](https://puneriawazz.in/?p=3857): पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील कासेवाडी डायस प्लॉट वसाहतीत अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले. काँग्रेस–शिवसेना (ठाकरे) आघाडीचे उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख यांनी वसाहतीतील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता या मूलभूत प्रश्नांना आगामी काळात प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले. उमेदवार रस्त्यावर प्रचार न करता थेट घरोघरी भेट देत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषतः महिलांनी औक्षण करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. डायस प्लॉट […] - [ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने भाजपच्या निवडणूक कचेरीचे भावनिक उद्घाटन](https://puneriawazz.in/?p=3854): पुणे : भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या, भावनिक आणि प्रेरणादायी सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि निस्वार्थ सेवेला वंदन करण्यात आले. या वेळी प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, रमेशजी परचुरे आणि किरणजी सरदेशपांडे यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून […] - [गणेश बिडकरांचा ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न ठरतोय नागरिकांसाठी दिलासादायक; प्रभाग २४ मध्ये हजारो समस्या मार्गी](https://puneriawazz.in/?p=3851): पुणे :गेली तीन वर्षे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. छोट्या-मोठ्या नागरी समस्यांसाठी महापालिकेच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. महापालिका अस्तित्वात नसतानाही सक्षम आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करून गणेश बिडकर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. पाणीपुरवठा, मलनिःसारण, रस्ते, बांधकाम परवाने, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना पूर्वी थेट शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता […] - [निकोलस मादुरो आणि पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक नाही; अफवांवर विराम, वस्तुस्थिती स्पष्ट](https://puneriawazz.in/?p=3848): पुणे दि. 4 :  व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक झाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही आंतरराष्ट्रीय माध्यमांत पसरवल्या जात असल्या तरी ४ जानेवारी २०२६ पर्यंत अशी कोणतीही अटक झालेली नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. मादुरो सध्या व्हेनेझुएलामध्ये सत्तेत असून प्रशासनावर त्यांचे नियंत्रण कायम आहे. मार्च २०२० मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने (U.S. Department of Justice) निकोलस मादुरो आणि त्यांच्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ‘नार्को-टेररिझम’, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने मादुरो यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास १५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय अमेरिका, युरोपियन […] - [डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांचा पॅरोल; २०१७ नंतर १५ व्यांदा तुरुंगाबाहेर](https://puneriawazz.in/?p=3844): पुणे दि. 4 :  रोहतक (हरियाणा) : डेरा सच्चा सौदा प्रमुख आणि बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. ४ जानेवारी २०२६ रोजी ही माहिती समोर आली असून, २०१७ मध्ये शिक्षा झाल्यानंतर ही त्याची १५ वी सुटका आहे. विशेष म्हणजे २०२६ या वर्षातील ही त्याची पहिलीच सुटका ठरली आहे. सध्या राम रहीम हा हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पॅरोल मंजूर झाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर पडणार असून, या काळात तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्रमात किंवा हरियाणातील शिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात वास्तव्यास […] - [‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कुटुंबातूनच सुरुवात आवश्यक; संवाद, संस्कार आणि सक्षमीकरणावर भर – मोहन भागवत](https://puneriawazz.in/?p=3839): पुणे दि. 4 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कौटुंबिक संवाद, संस्कार आणि सामाजिक सतर्कता या बाबींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी २०२६ मध्ये भोपाळ येथे आयोजित ‘स्त्री शक्ती संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, अशा घटनांना रोखण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न घरातून आणि कुटुंबातूनच सुरू झाले पाहिजेत. कुटुंबात मुला-मुलींशी नियमित आणि खुले संवाद नसल्यामुळे बाहेरील व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावर सहजपणे पडतो. त्यामुळे पालकांनी केवळ शैक्षणिक प्रगतीकडेच नव्हे, तर मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, संस्कार आणि मूल्यांची पायाभरणी लहानपणापासून झाली, तर मुले आपल्या मुळांशी […] - [बिग बॉस मराठी ३’चा उपविजेता अभिनेता जय दुधाणेला मुंबई विमानतळावरून अटक; ५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप](https://puneriawazz.in/?p=3836): पुणे दि. 4 : ‘बिग बॉस मराठी ३’चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. सुमारे ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात जय दुधाणेने बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकाने बेकायदेशीरपणे विकल्याचा तसेच जिम व्यवसायाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केवळ जयच नव्हे तर त्याच्या आई, बहीण तसेच आजी-आजोबांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, जय दुधाणेचे २४ डिसेंबर २०२५ रोजी हर्षला पाटीलसोबत लग्न झाले होते. लग्नाला अवघे १० ते ११ दिवस उलटले असतानाच […] - [बिनविरोध निवडींवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीला घातक प्रवृत्तीविरोधात सामान्य नागरिकांचा संताप](https://puneriawazz.in/?p=3832): पुणे दि. 4 : लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणाऱ्या बिनविरोध निवड प्रक्रियेविरोधात सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास दोन लाख मतदार असलेल्या मतदारसंघात जनतेला मतदानाचा हक्क न देता उमेदवार बिनविरोध निवडून आणले जाणे ही गंभीर व घातक बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. “अपक्ष उमेदवार उभे होते, मग त्यांचे अर्ज आणि त्यांचे काय झाले?” असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिनविरोध निवड म्हणजे जनतेच्या मतदान कार्डावरच गदा आणण्यासारखे असून, असेच चालणार असेल तर “आमची मतदान कार्ड थेट भाजपला देऊन टाकू का?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नागरिकांनी […] - [डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; मनुवाद्यांना धडा शिकवू – मुंबईत आंबेडकरवादी जनतेचा महामोर्चा](https://puneriawazz.in/?p=3829): मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात आंबेडकरवादी, संविधानप्रेमी नागरिकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. “मनुवाद मुर्दाबाद”, “संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण सीएसटी परिसर दुमदुमून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या विरोधातील कोणतेही अवमानकारक वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. संविधान वाचवण्याची जबाबदारी केवळ आंबेडकरवाद्यांची नसून ती संपूर्ण देशातील नागरिकांची आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. […] - [हाडाच्या आजाराने त्रस्त चिमुकलीचा आईकडून खून; वारजेमध्ये आई–लेकीची हृदयद्रावक घटना](https://puneriawazz.in/?p=3824): पुणे, दि. 3  : वारजे माळवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हाडांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा तिच्याच आईने दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर संबंधित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत चिमुकलीचे नाव शारवी आदिनाथ देवडकर (वय २ वर्षे ३ महिने) असून तिची आई छाया आदिनाथ देवडकर (वय २८) हिचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. ही घटना वारजे माळवाडीतील गोकुळनगर पठार परिसरातील कारगिल फार्म हाऊसजवळ घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महिलेचे पती आदिनाथ संताराम देवडकर (वय ३०) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत […] - [पुणे मनपा निवडणूक प्रचारात धक्का : हडपसरमधील प्रभाग ४१ मधील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांची आत्महत्या](https://puneriawazz.in/?p=3821): पुणे, दि. 3 : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या प्रचारादरम्यान हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान वाढलेल्या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कपूर हे सक्रियपणे प्रचारात सहभागी होते आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ही घटना घडल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे. दरम्यान, सादिक कपूर यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले असून, निवडणूक प्रचाराच्या काळात प्रतिस्पर्धी […] - [फुलेवाड्यातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; प्रभाग २२ मधील उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ— फुले दाम्पत्यांचा विचार समाजाला ऊर्जा देणारा : रमेश बागवे](https://puneriawazz.in/?p=3818): पुणे, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील फुलेवाडा येथून प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधील उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. फुलेवाड्यातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारास सुरुवात झाली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. फुले दाम्पत्यांचा विचार हा समाजाला दिशा व ऊर्जा देणारा असल्याचे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले व […] - [मुरलीधर मोहोळ–अजित पवार यांची प्रचारकी ‘नुरा कुस्ती’; पुणेकरांसाठी एकमेव सक्षम विरोधी पक्ष आम आदमी पार्टी – मुकुंद किर्दत](https://puneriawazz.in/?p=3815): पुणे दि. ३ : पुणे शहरातील गंभीर प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत केवळ प्रचारकी ‘नुरा कुस्ती’ करत आहेत, अशी घणाघाती टीका आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. पुणेकरांच्या समस्या या कोंबड्यांच्या झुंजीसारख्या एंटरटेनमेंटसाठी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहर आज कोयता गॅंग, वाढती गुन्हेगारी, अपघात, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, भ्रष्टाचार आणि कर्जबाजारी महापालिका अशा समस्यांनी ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी गेल्या आठ वर्षांत सत्तेत असलेल्या नेत्यांनी नेमके काय केले, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भ्रष्टाचाराचा […] - [“भाजप एकमेव पक्ष जो जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेतो” – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण](https://puneriawazz.in/?p=3812): पुणे, दि. ३ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत पुण्याच्या सर्वांगीण विकासाची शपथ आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घेतली. निवडणुकीला सामोरे जाताना जाहीरनामा जनतेसमोर मांडून निवडणूक लढवणारा भाजप हा एकमेव पक्ष असून, आतापर्यंत सादर केलेल्या १४ जाहीरनाम्यांतील प्रत्येक बाब पूर्णत्वास नेणारा भाजपच असल्याचा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. समताभूमी येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, […] - [‘२४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार’ – राघवेंद्र बाप्पु मानकर](https://puneriawazz.in/?p=3809): पुणे : नागरिकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत माझे सहकारी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालयाच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत असून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे स्वतःही २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन, असा विश्वास भाजपाचे प्रभाग क्रमांक २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राबवलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवून, शिस्तबद्ध संघटनात्मक बांधणीच्या जोरावर प्रभाग क्रमांक २५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या […] - [बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हळदीपूर यांना ‘पिफ्फ’ जीवनगौरव पुरस्कार; मराठी चित्रपट स्पर्धेतील ७ चित्रपटांची घोषणा](https://puneriawazz.in/?p=3804): पुणे दि. ३  : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ) २०२६ अंतर्गत यंदाचे प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा काळे आणि नामवंत संगीत दिग्दर्शक अमर हळदीपूर यांना जाहीर करण्यात आले आहेत. तसेच यंदाच्या मराठी चित्रपट स्पर्धा विभागातील ७ चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. १४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF 2026) […] - [भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही” – पिंपरी-चिंचवड सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट हल्ला](https://puneriawazz.in/?p=3802): पुणे, दि. ३  : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. भाजपवर आरोप करताना त्यांनी “राक्षसी भूक” असा शब्दप्रयोग केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली असून, ती प्रचंड कर्जाच्या खाईत लोटली आहे. विकासाच्या नावाखाली गैरव्यवहार सुरू असून, त्याचे गंभीर परिणाम शहराला भोगावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिकेत खुलेआम हप्तेखोरी सुरू असल्याचा दावा करत, “याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांवर टीका करताना पवार म्हणाले, “स्वतःच्या परिवाराला आणि […] - [“अजित पवारांनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे” – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घणाघाती टीका](https://puneriawazz.in/?p=3799): पुणे, दि. ३ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना “स्वतःच्या पक्षात आधी इंट्रोस्पेक्ट करावे” असा स्पष्ट सल्ला दिला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा तसेच महापालिका कर्जबाजारी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, अजित पवार ज्या पक्षावर टीका करत आहेत, तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा […] - [मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम](https://puneriawazz.in/?p=3796): पुणे, दि. ३ : ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभागातून सक्षम प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करत राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८७ ग्रामपंचायतींपैकी शासनाच्या निकषांनुसार २८२ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या ग्रामपंचायतींनी करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा व अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावतीकरण, ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग तसेच विविध विकासकामांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन “उत्कृष्ट ग्रामपंचायत” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. या […] - [सावित्रीमाईंच्या शेकडो लेकींनी केला संविधानाचा जागर; दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन](https://puneriawazz.in/?p=3793): पुणे : अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती भारतीय संविधान आणि ओठांवर सावित्री–ज्योतींचा जागर करत सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अवतरलेल्या शेकडो लेकींनी संविधान कट्ट्यावर संविधानाचा जागर केला. डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक, फुलेप्रेमी कवी व संविधानदूत विजय वडवेराव यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक जागर पार पडला. सभागृहात जणू सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले साक्षात अवतरल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली झाले. हा चार दिवसीय फेस्टिव्हल ५ जानेवारी २०२६ पर्यंत पुण्यातील नवी पेठेतील एस. एम. […] - [माजी सैनिकांसाठी सुरक्षा सहकारी पदाकरिता नोकरीची सुवर्णसंधी](https://puneriawazz.in/?p=3790): पुणे, दि. 3: माजी सैनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या सुरक्षा सेवा पुरवठा कंपनीमार्फत शेवाळवाडी, सोलापूर रोड, पुणे येथे सुरक्षा सहकारी पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या ०२०-४५०५३६१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे. गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्र, उच्चभ्रू निवासी सोसायट्या, कॉर्पोरेट व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, व्यावसायिक संकुले (मॉल्स), हॉस्पिटॅलिटी उद्योग, हॉटेल्स व रिसॉर्ट्स, उत्पादन व लॉजिस्टिक्स, फार्मा उद्योग, रुग्णालये, बँका, कॅश मॅनेजमेंट सेवा, शैक्षणिक संस्था, […] - [युवकांनी आधुनिक कलांचा विकास करावा – उपसंचालक उदय जोशीराज्यस्तरीय युवा महोत्सव पुण्यात यशस्वीपणे संपन्न; लातूर व कोल्हापूर विभागाचे वर्चस्व](https://puneriawazz.in/?p=3787): पुणे, दि. 3 : युवकांचा सर्वांगीण विकास घडवणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याच्या उद्देशाने २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे आयोजित सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे पार पडला. या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी यांनी युवकांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करत आपल्या अंगी असलेल्या आधुनिक कलांचा विकास करावा, असे आवाहन केले. युवकांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये युवकांच्या मतांना केंद्रस्थानी स्थान दिले जाईल, असेही त्यांनी […] - [लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ; आता ९ जानेवारीपर्यंत संधी](https://puneriawazz.in/?p=3784): पुणे, दि. 3 : सैनिक कल्याण विभागातील लिपिक-टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना आता ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे. या पदभरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर ७ डिसेंबर २०२५ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे विभागाचे अधिकृत संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रिय झाल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सोयीसाठी अर्जाच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला […] - [मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा’ – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश](https://puneriawazz.in/?p=3782): पुणे, दि. 3 : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. शासन, महसूल व वन विभागाच्या १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना शेतातील पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या शासन निर्णयानुसार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी […] - [पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल यांचा आढावा](https://puneriawazz.in/?p=3779): पुणे दि. 2 : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ०२ जानेवारी २०२६) दुपारी ४.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या विभागातील निवडणूक कामकाजाची अद्ययावत माहिती सादर केली. मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल यांनी निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त केले. निवडणूक प्रक्रिया ही पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शी असावी, असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी आचारसंहिता भंगासंदर्भातील प्रत्येक तक्रारीवर गांभीर्याने व निष्पक्षपणे कार्यवाही […] - [भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध नगरसेवक; पुण्यात विजयाची घौडदौड सुरू – महापौर भाजपचाच होणार : मुरलीधर मोहोळ](https://puneriawazz.in/?p=3776): पुणे : भारतीय जनता पक्षावरील नागरिकांचा वाढता विश्वास पाहता विरोधकांनाही आता वस्तुस्थितीची जाणीव झाली आहे. भाजपच्या पाठीशी असलेल्या जनभावना लक्षात घेता आणि अनामत रक्कम जप्त होण्याची भीती वाटत असल्यानेच विरोधक निवडणुकीतून माघार घेत आहेत. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या विजयाची घौडदौड सुरू झाली आहे, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी व्यक्त केला. यंदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, तसेच शिवसेनेसह मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सनसिटी माणिकबाग येथील प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यानिमित्ताने शहर भाजप कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दोन्ही […] - [सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा ओढा भाजपकडे; प्रभाग २४ मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा गणेश बिडकरांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश](https://puneriawazz.in/?p=3773): पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाकडे वाढताना दिसत आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.या पक्षप्रवेशामध्ये पुणे महानगरपालिका मनसे कामगार आघाडीचे प्रमुख रितेश शिकोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. याच वेळी भगवान श्री जाहर वीर गोगाजी सेवा समिती आणि महाराष्ट्र महर्षी वाल्मिक महाराज संघटना यांनीही त्यांच्या वतीने […] - [महाराष्ट्राला बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात विशेष अधिकार व स्वतंत्र कायदा करावा – नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी](https://puneriawazz.in/?p=3770): पुणे : राज्यात वाढत चाललेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाला तातडीने विशेष अधिकार देऊन स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीपत्र पाठविण्यात आल्याची माहिती ॲड. मंजिरी जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अमेय सप्रे आणि ॲड. सर्वेश मेहेंदळे उपस्थित होते. ॲड. मंजिरी जोशी पुढे म्हणाल्या की, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) ताब्यात देण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात आले. तसेच पहलगाम […] - [२०२६ च्या पहिल्याच दिवशी साईबाबांच्या चरणी ८० लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण](https://puneriawazz.in/?p=3767): पुणे, दि. 2 :  नूतन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी एका भाविकाने तब्बल ८० लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण करून आपली भक्ती व्यक्त केली. हैद्राबाद येथील साईभक्त कनका रेड्डी यांनी हा मौल्यवान मुकुट श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडे सुपूर्द केला आहे. या सुवर्ण मुकुटाचे अंदाजे वजन ७०७ ग्रॅम असून त्यावर आकर्षक व मौल्यवान हिर्‍यांची जडणघडण करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत देशभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली असून, या दानामुळे मंदिराच्या खजिन्यात मोलाची भर पडली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडून या देणगीची अधिकृत नोंद घेण्यात आली असून, ट्रस्टच्या वतीने दानशूर भक्ताचे आभार मानण्यात […] - [‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात दमदार पदार्पण](https://puneriawazz.in/?p=3764): पुणे, दि. 2 : मराठी चित्रपटसृष्टीत नवे विषय, नवे प्रयोग आणि नव्या दमाचे दिग्दर्शक सातत्याने आपली छाप उमटवत आहेत. याच परंपरेत आता शेखर बापू रणखांबे यांचे नाव नव्या दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या धडाकेबाज टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर चित्रपटाबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. मुंबईत संघर्ष करत करिअरची सुरुवात करणाऱ्या शेखर बापू रणखांबे यांनी अनेक अडचणींवर मात केली. सुरुवातीच्या काळात प्लंबिंगसारखी कामे करत त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. त्यानंतर रंगभूमीशी नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना […] - [पुणे महापालिका निवडणूक २०२६ : अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर ‘गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारी’वरून तीव्र टीका](https://puneriawazz.in/?p=3762): पुणे, दि. 2 : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत विरोधकांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सर्वाधिक वादग्रस्त ठरलेली उमेदवारी म्हणजे कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना बावधन येथील प्रभाग क्रमांक १० मधून दिलेली उमेदवारी. याशिवाय आयुष कोंकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर यांनाही उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता, या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पिंपरी-चिंचवड भागातही […] - [नूतन वर्षाच्या स्वागतात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहिम; पिंपरी-चिंचवडमध्ये २४० वाहनचालकांवर कारवाई](https://puneriawazz.in/?p=3759): पुणे, दि. 2 : वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र या काळात काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याने अपघातांची शक्यता वाढते. स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेमार्फत ही विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या १३ […] - [२५ लाख अनुयायांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न](https://puneriawazz.in/?p=3756): पुणे दि. 2 : ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात व पूर्ण शांततेत पार पडला. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या सुमारे २५ लाख आंबेडकरी अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन करून शौर्यदिन साजरा केला. या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व सर्व अनुयायांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. १८१८ साली झालेल्या कोरेगाव भीमा लढ्यात शहीद झालेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येथे उपस्थित राहतात. यंदा तब्बल २५ लाख अनुयायांनी उपस्थिती लावत आपल्या पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना दिली. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित […] - [अजित पवारांना राजकारण शिकवू नका; पुण्याच्या खासदारांवर राष्ट्रवादीचा घणाघात](https://puneriawazz.in/?p=3753): पुणे दि. 2 : गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यास मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा ‘आका’ बाजूला घेऊन बसणाऱ्यांनी आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या पुणे शहराच्या सुसंस्कृत खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राजकारण शिकवू नये, असा जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. पुणे शहरात झालेल्या निवडणुकीत ‘काठावर’ मिळालेल्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही मोलाचा वाटा आहे, हे विसरू नये, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गरज संपली की वैद्याला मरण येऊ द्यायचे, अशी ‘गरज सरो वैद्य मरो’ भूमिका भाजपची नेहमीची राहिली असून ही भूमिका लोकशाहीला आणि राजकीय संस्कृतीला साजेशी नसल्याची […] - [क्रांतिज्योतीच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाचा खास शो](https://puneriawazz.in/?p=3750): पुणे, दि. 2 : बहुचर्चित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषेचे महत्त्व, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी वेध घेणाऱ्या या चित्रपटाने सर्व स्तरातील प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन संपूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे. मराठी भाषा आणि शिक्षणाबाबत सातत्याने सकारात्मक विचार मांडणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्यांच्यासारखेच समविचारांचे ॲड. अभिजीत पोखरणीकर यांच्या सहकार्याने पुण्यात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. ॲड. अभिजीत पोखरणीकर हे एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक असून, ही संस्था पुण्यातील सिग्नल स्कूलमधील मुलांचे शिक्षण व संगोपन करते. चित्रपटाच्या […] - [पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होणार – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ](https://puneriawazz.in/?p=3746): पुणे, दि. 2 : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली असून आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा विकासालाच साथ देतील. त्यामुळे पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. बाजीराव रस्ता येथील भारत भवन येथे पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र […] - [आलिशान गाड्यांच्या स्पर्धेत ‘माणुसकीची रुग्णवाहिका’ ठरतेय लक्षवेधी; प्रभाग २५ मधील बाप्पु मानकरांची साधी संपत्ती चर्चेत](https://puneriawazz.in/?p=3742): पुणे, दि. 2 : आलिशान गाड्या, महागडे ताफे आणि झगमगाट यांची चर्चा निवडणूक काळात नेहमीच ऐकायला मिळते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांच्या कोट्यवधींच्या वाहनसंपत्तीची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्या झगमगाटात प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांची एक वेगळीच ‘माणुसकीची गाडी’ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रतिज्ञापत्रानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर एकही आलिशान चारचाकी नसून त्यांच्याकडे केवळ एक रुग्णवाहिका आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका केवळ कागदोपत्री नसून, त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयामार्फत गरजू नागरिकांच्या सेवेसाठी नियमितपणे कार्यरत आहे. राघवेंद्र बाप्पु मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५, शनिवार पेठ – महात्मा […] - [भैरवनाथांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे रणशिंग; प्रभाग ४१ व १६ मधील प्रचार मोहिमेला शुभारंभ](https://puneriawazz.in/?p=3739): महादेववाडी येथील पवित्र भैरवनाथ महादेवांच्या साक्षीने शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ४१ व प्रभाग क्रमांक १६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा विधीवत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. श्रद्धा, निष्ठा आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या वेळी प्रभाग क्रमांक ४१ चे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, स्वातीताई टकले, सारिका ताई पवार, मच्छिंद्र दगडे तसेच प्रभाग क्रमांक १६ चे अधिकृत उमेदवार शैलजाताई जयसिंग अण्णा भानगिरे यांच्यासह अनेक मान्यवर उमेदवार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुत्वाचा ठाम विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवत, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणारी आणि विकासालाच केंद्रस्थानी ठेवणारी शिवसेना ही नेहमीच सर्वसमावेशक […] - [राजकारणापलीकडची जिव्हाळ्याची नाती! निवडणुकीच्या रणधुमाळीत गणेश बिडकरांकडून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भावनिक भेट](https://puneriawazz.in/?p=3736): पुणे, दि. 1 : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार, बैठका आणि राजकीय समीकरणांचा धडाका सुरू असतानाही प्रभाग क्रमांक २४ ‘ड’ चे उमेदवार व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राजकारणापलीकडची माणुसकी आणि जिव्हाळ्याची नाती जपण्याचे दर्शन घडवले आहे. पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी आज सदिच्छा भेट घेतली. गणेश बिडकर यांनी दिवंगत माजी महापौर स्व. मोहनसिंग राजपाल यांच्या निवासस्थानी जाऊन राजपाल कुटुंबीयांची भेट घेतली. मोहनसिंग राजपाल महापौर असताना गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या आपुलकीच्या भेटीत त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधताना गणेश बिडकर […] ## Pages - [Business](https://puneriawazz.in/?page_id=749) - [About Us](https://puneriawazz.in/?page_id=285): Puneri Awazz News Puneri Awazz is a 24-hour Marathi news channel in India. Puneri Awazz is a Marathi news channel that provides you with comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on Puneri Awazz in the Marathi language. The vision of the channel promises to keep each individual ahead and informed. Puneri Awazz is a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs. Contact DetailsMobile Number:-9284603707Email […] - [Privacy Policy](https://puneriawazz.in/?page_id=3): Welcome to Puneri Awazz (https://puneriawazz.in). Your privacy is important to us. This Privacy Policy outlines how we collect, use, and protect your information when you visit our website. 1. Information We Collect We may collect the following types of information: a. Personal Information b. Non-Personal Information 2. How We Use Your Information We use your information to: 3. Cookies and Third-Party Services We use cookies to: Note: Google may use cookies to serve ads based on your prior visits to this and other websites. You may opt out of personalized advertising by visiting: Google Ads Settings 4. Google AdSense Our […] - [Home](https://puneriawazz.in/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)